सैन्यदल परीक्षेसाठी 20 पासून प्रशिक्षण
कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत सी.डी.एस. परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी पूर्व प्रशिक्षण केंद्र कोर्स क्रमांक 64 मध्ये सी डी एस कोर्स आयोजित करण्यात येत आहे. जिह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावे.
मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ द सैनिक वेल्फेअर पुणे (डी.एस.डब्ल्यू.) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्या मधील सी डी एस कोर्स क्रमांक 64 कोर्स किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेश पत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टाची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून घेऊन यावे.
मुलाखतीस पात्रता सदस्य डी एस वर्ग मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला जाताना सोबत घेऊन जावे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसेवा आयोग यूपीएससी, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा. या कालावधीत नि: शुल्क प्रशिक्षण आणि निवास भोजन दिले जाणार आहे.
training.petenashik@gmail.com वर संपर्क करावा, असे आवाहन ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले.