न्हावेलीत ३ मार्चला पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर
न्हावेली /वार्ताहर
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ॲस्कड अंतर्गत न्हावेली ( चौकेकरवाडी ) रविंद्र धाऊसकर यांच्या घरी माहिती शिक्षण व जनसंपर्क अभियान एक दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर,कार्यक्रमाचे उद्धाटन ग्रामपंचायत सरपंच अष्टविनायक धाऊसकर,सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ.शरद अस्वले,सहाय्यक आयुक्त पशुसंर्वधन व दुग्धव्यवसाय,तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय,सावंतवाडी डॉ.सुनाद बाळगी,पशुवैद्यकीय अधिकारी,पशुवैद्यकीय चिकित्सालय निरवडे,डॉ.विठ्ठल कराळे,पशुवैद्यकीय अधिकारी,पशुवैद्यकीय चिकित्सालय माडखोल,डॉ.नितीन रेडकर,पशुवैद्यकीय अधिकारी,कोकण विभाग कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक व प्रक्रिया संघ गोकुळ हे उपस्थित राहणार आहेत.