For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गात २४ पासून मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर

05:31 PM Apr 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
दोडामार्गात २४ पासून मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90
Advertisement

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे आयोजन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर येत्या 24 ते 28 एप्रिलला दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सकाळी ७.३० ते १० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात परंपरा, धैर्य ,संस्कार याविषयी मार्गदर्शन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन मुलांमधील धैर्य ,शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे . या शिबिरात लाठीकाठी, तलवारबाजी , प्रात्यक्षिक पारंपरिक युद्ध कला ,शारीरिक तंदुरुस्ती , वशिष्ठ आत्मसंरक्षण तंत्र असे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठ वर्षावरील मुलगे व मुली या प्रशिक्षणात सहभाग घेऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9405958286वर संपर्क साधावा व आपल्या पाल्यांची नोंदणी लवकरात लवकर करावी

Advertisement

Advertisement
Tags :

.