For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात

09:59 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात
Advertisement

बेळगाव : स्विमर्स व अॅक्वेरिस क्लबतर्फे 22 व्या दिव्यांग प्रशिक्षण शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी जवळपास 200 हून अधिक दिव्यांग जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. जेएनएमसी सुवर्ण जलतरण तलावात 22 व्या दिव्यांग जलतरण प्रशिक्षण शिबिराची सांगता करण्यात आली. गेले 20 दिवस हे शिबिर चालू होते. दरवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत जलतरण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात जवळपास 200 हून अधिक दिव्यांगपटूंनी सहभाग घेतला होता.  शिबिरात जास्तीजास्त दिव्यांगपटूंनी पोहण्याचे धडे गिरविले. सांगता समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर विंगचे कर्नल अजितसिंग, एसकेई सोसायटीचे क्रीडा विभागा प्रमुख आनंद सराफ, एस. सलमा, लता कित्तूर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कर्नल अजितसिंग म्हणाले, स्विमर्स व अॅक्वेरिस क्लबने दिव्यांग खेळाडूंसाठी जो उपक्रम हाती घेतला आहे. तो कौतुकास्पद आहे. सामान्य खेळाडूंना जलतरण शिकविणे सोपे जाते पणा दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देणे ही तारेवरची कसरत आहे. असाच उपक्रम या क्लबने राबवावा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद सराफ, एस. सलमा, लता कित्तूर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. हे जलतरण शिबिर यशस्वी करण्यासाठी स्विमर्स व अॅक्वेरिस क्लबच्या उमेश कलघटगी, नितीश कुडूचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतीकर, अजित जनकट्टी, समीर नदाफ, विनोद दोडमनी, शिवाजी, संजू हंचीनमनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.