महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जिंदगीनामा’चा ट्रेलर प्रदर्शित

06:49 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संघर्ष अन् शक्तीच्या प्रभावी कहाण्या दिसणार

Advertisement

सद्यकाळात प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या कारणामुळे झगडत आहे. प्रत्येकव्यक्तीचा स्वत:चा एक संघर्ष आहे. अशाप्रकारच्या लढाया नेहमीच शांतपणे लढल्या जातात आणि याचा आवाज कधीच कुणाला ऐकू येत नाही. स्वत:मधील संघर्षाला अनेक जण दुर्लक्षित करतात. जीवनातील याच संघर्षाला दर्शविणारी सीरिज ‘जिंदगीनामा’ लवकरच भेटीला येणार आहे.

Advertisement

सोनी लिवची ही आगामी सीरिज दमदार संघर्षांची कहाणी मांडणारी आहे. जीवनातील भावनात्मक चित्रण दर्शविणारी ही सीरिज प्रेक्षकांची मने जिंकण्यास आणि मनांवर ठसा उमटविणारी आहे. ही सीरिज 6 अनोख्या कहाण्यांच्या माध्यमातून अनेक आव्हानांसोबत जीवनाचा प्रवास दर्शविते. या कहाण्यांचे शीर्षक भंवर, स्वागतम, वन प्लस वन, केज्ड, पपेट शो आणि पर्पल दुनिया असणार आहे.

ही एंथोलॉलजी मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांच्या भावनात्मक स्थितीचा शोध घेते. प्रत्येक कहाणीचे स्वत:चे एक जग असून आव्हाने देखील आहेत. प्रत्येक कहाणी इका तीव्रतेसोबत समोर येते.  जिंदगीनामाचा प्रीमियर 10 ऑक्टोबरपासून सोनी लिववर होणार आहे.

या सीरिजमध्ये श्वेता बसू प्रसाद, प्रिया बापट, प्राजक्ता कोळी, यशस्विनी दयामा, लिलेट दुबे, श्रेयस तळपदे, अंजली पाटील, सुमीत व्यास, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी, सयानदीप सेनगुप्ता, तन्मय धनानिया आणि श्रुती सेठ दिसून येणार आहे. आदित्य सरपोतदार, सुकृती त्यागी, मिताक्षरा कुमार, डॅनी मामिक, राखी शांडिल्य आणि सहान यांनी या  कहाण्यांचे दिग्दर्शन पेल आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article