‘वेडिग डॉट कॉन’चा ट्रेलर प्रदर्शित
अमेझॉन प्राइम व्हिडिओने एक क्राइम ओरिजिनल डॉक्यू सीरिज ‘वेडिंग डॉट कॉन’ची घोषणा केली असून याचा ट्रेलरही प्रदर्शित केला आहे. बीबीसी स्टुडिओज इंडिया प्रॉडक्शनची ‘वेडिंग डॉट कॉन’ सीरिज डोळे उघडणारी आणि हादरवून सोडणारी आहे. यात प्रेम आणि साथीदाराच्या शोधात असलेल्या पाच महिलांना दाखविण्यात आले आहे. या महिलांना फसवणूक आणि विश्वासघाताच्या जाळ्यात अडकविण्यात आल्यावर त्यांचा शोध एक विचित्र वळण घेत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. वेडिंग डॉट कॉनचा प्रीमियर भारतात प्राइम व्हिडिओवर 29 डिसेंबर रोजी केला जाणार आहे. ही सीरिज सत्य-अपराधाला दर्शविणाऱ्या 5 महिलांच्या कहाण्यांवर आधारित आहे. या महिला एका आनंदी वैवाहिक जीवनाचे स्वत:चे स्वप्न पूर्ण करू पाहत असतात. परंतु आयुष्याचा जोडीदाराचा हा शोध एक दु:खद वळण घेतो आणि त्या फसवणूक आणि भावनात्मक शोषणाच्या शिकार ठरतात. नकली ओळख निर्माण करत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हे गुन्हेगार संभाव्य वराच्या स्वरुपात समोर येतात आणि महिलांची फसवणूक करतात.वेडिंग डॉट कॉम केवळ रंजक कहाण्यांचे कलेक्शन नसून ही जागरुकता निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली कहाणी आहे. ही सीरिज ऑनलाइन मॅचमेकिंगचे काळे सत्य दाखविते. महिलांवर समाजाकडून विवाहासाठी टाकला जाणारा दबाव आणि विकृत मानसिकतेचे गुन्हेगार यात दर्शविण्यात आले असल्याचे बीबीसी स्टुडिओजकडून सांगण्यात आले.