‘वॉर 2’चा ट्रेलर प्रदर्शित
ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत
ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘वॉर’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ऋतिक यात पुन्हा एकदा मेजर कबीर धालीवाल म्हणून परतणार आहे. तर ज्युनियर एनटीआर एका धोकादायक एजंट विक्रमच्या भूमिकेत दिसून येईल. अॅक्शनने भरपूर ट्रेलर अत्यंत जबरदसत असून चाहत्यांची उत्सुकता यामुळे वाढली आहे.
‘वॉर 2’मध्ये जागतिक पार्श्वभूमीवर रचलेली कहाणी असून यात ऋतिक आणि ज्युनियर एनटीआरला ‘वॉरियर’ आणि ‘सोल्जर’च्या स्वरुपात दर्शविण्यात आले आहे. भारतासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करू पाहणाऱ्या या भूमिका आहेत. यात कर्तव्य, बलिदान आणि सन्मानाची कहाणी आहे.
ट्रेलरमध्ये ऋतिक आणि कियारा यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीची झलकही दाखविण्यात आली आहे. परंतु तिच्या भूमिकेविषयी फारसे समोर आलेले नाही. वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित ‘वॉर 2’ चित्रपट वर्षातील सर्वात मोठा अॅक्शनपट असल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.