महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘टू किल अ टायगर’चा ट्रेलर सादर

06:13 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रियांका चोप्राकडून निर्मितीत योगदान

Advertisement

‘टू किल अ टायगर’ या माहितीपटाशी प्रियांका चोप्रा ही कार्यकारी निर्माती म्हणून जोडली गेली आहे. हा माहितीपट नेटफ्लिक्सकडून जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे. प्रियांकाने आता याचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा माहितीपट झारखंडमधील एका सत्यघटनेवर आधारित आहे. या माहितीपटला ऑस्करसाठी नामांकन प्राप्त झाले होते.

Advertisement

टू किल अ टायगरचा ट्रेलर अत्यंत दमदार असून तो पाहिल्यावर पूर्ण माहितीपट पाहण्याची इच्छा बळावणार आहे. टू किल अ टायगरच्या ट्रेलरमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनेचा उल्लेख आहे. तसेच यासंबंधी स्थानिक महिलांच्या प्रतिक्रिया यात दिसून येतात. तसेच पीडित मुलीचा आवाज ऐकू येतो, तिला आरोपीने धमकाविले होते. गावातील वातावरण, लोकांच्या समजुतीदरम्यान पीडितेच्या पित्याचे म्हणणे ऐकू येते. जेव्हा मला माझ्या मुलीची हिंमत दिसून येते, तेव्हा सर्व भीती दूर पळते असे तिचा पिता सांगत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. पिता स्वत:च्या मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या खटल्याप्रकरणी लढतोय ही सामान्य घटना नसल्याचे एका महिलेने म्हटल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.

पोराने भावनेच्या भरात चूक केली, मग त्याला मारून टाकायचे का अशी विचारणा सामूहिक बलात्काराच्या मुख्य आरोपीचा नातलग करत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या ट्रेलरमध्ये पारंपरिक भारीतय समाजाची मानसिकता प्रेक्षकांसमोर ठेवली जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article