‘द ताज स्टोरी’चा ट्रेलर सादर
अभिनेता परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘द ताज स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाच्या विषयावरुन वाद होण्याची शक्यता आहे. वार्निम ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि सीए सुरेश झा यांच्याकडून निर्मित या चित्रपटाची कहाणी लेखन आणि दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केले आहे. ताजमहालशी निगडित जुन्या धारणांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कहाणीची झलक या ट्रेलरमध्ये दिसून येते. परेश रावल हे विष्णू दास ही भूमिका साकारत आहे. विष्णू दास हे भारताच्या प्रतिष्ठित स्मारकामागील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. यादरम्यान त्यांच सामना विचारसरणींशी होतो, ज्यामुळे न्यायालयीन लढाईचे सत्र सुरू होते असे ट्रेलरमध्ये दिसून येते. विष्णू दास हे ताजमहालखाली निर्मित 22 खोल्यांचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागताच कायदेशीर लढाई सुरू होते. ट्रेलरमध्ये न्यायालयातील युक्तिवाद दाखविण्यात आले आहेत. हुसैन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमिता दास मुख्य भूमिकेत आहेत.