‘स्टोलन’ चित्रपटाचा ट्रेलर सादर
3 जूनला प्रदर्शित होणार चित्रपट
अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘स्टोलन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्टोलन एक क्राइम थ्रिलर असून याचे दिग्दर्शन करण तेजपालने केले आहे.गौरव ढींगराने जंगल बुक स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत याची निर्मिती केली असून अनुराग कश्यप, किरण राव, निखिल अडवाणी आणि विक्रमादित्य मोटवानी याचे कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट 4 जून रोजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्नासोबत मिया मेल्जर, साहिदुर रहमान आणि शुभम वर्धन मुख्य भूमिकेत आहेत. राजस्थानच्या एका छोट्या रेल्वेस्थानकावरून ट्रेलरची सुरुवात होती. तेथे झोपलेल्या एका मुलीचे अपहरण होते, मुलगी गायब झाल्यावर तिची आई रडू लागते, यावेळी दोन जण तिच्या मदतीसाठी पुढे येतात, पोलीस पोहोचतात, मुलीचा शोध सुरू होतो, परंतु कहाणीत एक वेगळाच ट्विस्ट येतो.
दोन्ही युवक महिलेच्या मदतीसाठी स्वत:च्या वाहनातून भटकू लागतात, तर पोलीस वायरलेसवर एक मेसेज येतो आणि आता दोन्ही युवक आणि महिलेवरच मुलगी चोरीचा आरोप होतो. हळूहळू गुंडांची टोळी आणि मग पूर्ण गाव त्यांच्यामागे लागते. कहाणीत पुढे काय घडते हे चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.