‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर सादर
06:45 AM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल दमदार भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याचे चाहते आता ‘जाट’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता दुणावत जाट चित्रपटाचा ट्रेलर सादर केला आहे. या चित्रपटात सैयामी खेर ही अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहे.
Advertisement
माइथ्री मूव्हीच्या बॅनर निर्मित ‘जाट’ हा चित्रपटअॅक्शनपट असणार आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेचे नाव राणातुंगा असून ती रणदीप हुड्डाने साकारली आहे. राणातुंगाची पूर्ण गावात दहशत असते. या चित्रपटातील दमदार डायलॉग असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे. ‘जाट’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
Advertisement
Advertisement