‘धुरंधर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
रणवीर सिंह, माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत
अभिनेता रणवीर सिंह सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘धुरंधर’वरून चर्चेत आहे. आदित्य धरच्या दिग्दर्शनात तयार धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरच्या प्रारंभी अर्जुन रामपाल दिसून येत असून यात तो आयएसआयच्या मेजर इक्बाल ही भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सत्यघटनेने प्रेरित असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंह आणि आर. माधवन यांच्या व्यक्तिरेखांची देखील एंट्री होते, जे पाकिस्तानचे कट उधळून लावण्याची रणनीति आखत असतात. चित्रपटात माधवन हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित भूमिका साकारत आहे. तर रणवीर सिंह हा रॉ एजंटची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षय खन्ना हा रहमान डकैतच्या भूमिकेत असून सजय दत्तने चौधरी अस्लम ‘द जिन्न’हे पात्र साकारले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची मने जिंकत असून हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याचा पहिला भाग 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याचे समजते.