‘अल्फा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
आलिया अन् शर्वरी मुख्य भूमिकेत
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा पुढील चित्रपट ‘अल्फा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, बॉबी देओल, शर्वरी वाघ आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. आलिया आणि शर्वरी दोन्ही अभिनेत्री या चित्रपटात अॅक्शन अवतारात आहेत.
आलिया या चित्रपटात सीता नावाची भूमिका साकारत आहे. बॉबी देओल साकारत असलेली भूमिका या सीताला ‘अल्फा’ मिशनसाठी प्रशिक्षण देतो. ट्रेलरच्या प्रारंभी बॉबीची भूमिका नकारात्मक छटा असलेली दिसून येते. ट्रेलरमध्ये आलिया भट्ट थरारक अॅक्शन करताना दिसून येते. शर्वरीही अॅक्शन प्रकरणी काही दृश्यांमध्ये आलियापेक्षा वरचढ ठरत असल्याचे जाणवते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैलने केले आहे.
ट्रेलरच्या अखेरीस एक सरप्राइज आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनही दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन, सस्पेंस आणि रोमांच आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा 7 वा चित्रपट आहे. परंतु महिला स्पायवर आधारित हा पहिला चित्रपट असेल. 3 जुलैपासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.