‘सन ऑफ सरदार 2’चा ट्रेलर सादर
अजय देवगणचा चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता निर्मात्यांनी याचा सीक्वेल तयार केला असून याला ‘सन ऑफ सरदार 2’ नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगण अत्यंत नव्या शैलीत दिसून येत आहे.
ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि मृणाल ठाकूर एका जोडप्याचा विवाह करवून देऊ इच्छित असल्याचे दिसून येते. परंतु यात अनेक अडचणी येतात. ट्रेलरमध्ये संजय मिश्रा आणि रवि किशन यांच्या भूमिकांची झलक दिसून येते. या चित्रपटाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ चे दिग्दर्शन विजय कुमार अरोडा यांनी केले आहे. तर निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, एनआर. पचीसिया आणि प्रवीण तलरेजा यांनी केली आहे. चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर आणि संजय मिश्रा हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मागील वर्षी एडिनबर्गमध्ये पार पडले आहे.