For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्काय फोर्स’चा ट्रेलर सादर

07:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘स्काय फोर्स’चा ट्रेलर सादर
Advertisement

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘स्काय फोर्स’चा देशभक्तीने भरपूर ट्रेलर सादर करण्यात आला आहे. अक्षय कुमार, निमरत कौर, सारा अली खान आणि शरद केळकरसोबत वीर पहाडिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1965  साली भारताने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राइक आणि मिशनमध्ये बेपत्ता झालेल्या वायूसैनिकावर आधारित आहे. चित्रपटाची कहाणी युद्धातील सत्यघटनेवर बेतलेली आहे. भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सरगोधा वायुतळावर हवाई हल्ला केला होता. याला भारतीय वायुदलाचा पहिला आणि सर्वात घातक हल्ला मानले जाते. ‘पडोसियों को बताना होगा कि हम भी घुसकर मार सकते हैं, अब सोच बदलनी पडेगी, दुसरा गाल हम फौजी नहीं दिखाते हैं’ असा संवाद अक्षयच्या तोंडी आहे. वायुदल पाकिस्तानवर पहिला एअर स्ट्राइक करताना आणि या मिशनचे नाव स्काय फोर्स असल्याचे दाखविण्यात आले. या मिशनमध्ये वायुसैनिक बेपत्ता होत असल्याची कहाणी यात आहे. वायुसैनिकाची भूमिका वीर पहाडियाने साकारली असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत सारा अली खान आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.