For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘रोड हाउस’चा ट्रेलर प्रदर्शित

06:07 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रोड हाउस’चा ट्रेलर प्रदर्शित

21 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर झळकणार

Advertisement

डौग लिमन यांच्या 1989 च्या क्लासिक ‘रोड हाउस’च्या रुपांतरणात जेक गिलनेहालला बार ब्रॉल्सच्या मिस्टर रोजर्सच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे.  रोड हाउसचा दमदार अॅक्शनने भरपूर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेक गिलेनहाल एक माजी-यूएफसी मिडिलवेट फायटर एलवूड डाल्टनच्या भूमिकेत आहेत.

ट्रेलरमध्ये जेक गिलेनहालला एलवूड डाल्टनच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे. डाल्टन हे एक माजी-यूएफसी मिडिलवेट फायटर असल्याचे आणि ईजा झाल्यावर बरे होण्यास असमर्थ असल्याचे ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे. त्यानंतर तो बीट-अप कारमध्ये राहतो आणि भूमिगत फाइट केजमध्ये भाग घेत असल्याचे दिसून येते.

Advertisement

हा चित्रपट डग लिमन यांच्या 1989 मधील पॅट्रिक स्वेज स्टारर चित्रपटाचा रिमेक आहे. ‘रोड हाउस’मध्ये कॉनर मॅकग्रेगर, डेनिएला मेल्चियोर, बिली मॅगनसॅन, जेसिका विलियम्स, जोआकिन डी अल्मेडा, लुकास गेज, आर्टुरो कास्त्राs, बीके कॅनन, ब्यू नॅप, डॅरेन बार्नेट, डोमिनिक कोलंबस, बॉब मेनरी, केविन कॅरोल हे कलाकार दिसून येणार आहेत. तर ट्रॅव्हिस वान विंकल, हन्ना लानियर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती जोएल सिल्वर यांनी केली आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.