For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रविना टंडनच्या चित्रपटाचा ट्रेलर सादर

06:48 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
रविना टंडनच्या चित्रपटाचा ट्रेलर सादर
Advertisement

9 ऑगस्टला होणार प्रदर्शित

Advertisement

संजय दत्त आणि रविना टंडन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट घुडचडीचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पार्थ सामंथ आणि खुशाली कुमार देखील दिसून येणार आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

जियो सिनेमाने स्वत:च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर याचा ट्रेलर शेअर केला आहे. पूर्ण ट्रेलरमध्ये अनेक विनोदी दृश्यांसोबत भरपूर गोंधळ दिसून येणार आहे. एक पिता स्वत:च्या मुलाला पत्नी शोधता शोधता स्वत:साठी अर्धांगिनी शोधत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. यानंतर चित्रपटातील विविध पात्रांमुळे निर्माण झालेल्या गोंधळादरम्यान विनोदाची पेरणी करण्यात आली आहे.

Advertisement

घुडचडी चित्रपटाची कथा दीपक कपूर भारद्वाज आणि बिनॉय गांधी यांनी लिहिली आहे. बिनॉय गांधी यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दोन पिढ्यांचे प्रेम दाखविण्यात आले आहे. पहिल्या पिढीत संजय दत्त आणि रविना टंडन रोमांस करताना दिसून येतील. तर दुसऱ्या पिढीत पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांची जोडी दिसून येईल.

घुडचढी या चित्रपटाद्वारे पार्थ समथान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याचबरोबर संजय दत्त पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर चित्रपटात अरुणा इराणी, अंचित कौर आणि नवनि परिहार हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.