‘परम सुंदरी’चा ट्रेलर प्रदर्शित
मोठ्या पडद्यावर दिसणार उत्तर अन् दक्षिणेची प्रेमकथा
रोमँटिक चित्रपटांची व्रेज पुन्हा वाढत आहे. चित्रपट निर्मात्यांनी हीच बाब हेरून आता रोमँटिक चित्रपटांच्या निर्मितीवर भर देत आहेत. सैयारानंतर आता परम सुंदरी नावाचा रोमँटिक चित्रपट असून यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक तुषार जलोटा यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. या चित्रपटात उत्तर आणि दक्षिणेची प्रेमकथा दाखविली जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाची पूर्ण झलक दिसून येत आहे. मॅडॉक फिल्म्सकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात उत्तर आणि दक्षिणेच्या संस्कृतीचा मिलाप दाखविण्यात आला आहे. यात सिद्धार्थने उत्तर भारतीय असलेल्या परम या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तर जान्हवीने दाक्षिणात्य सौंदर्यवतीची भूमिका साकारली आहे. दोघेही परस्परांच्या प्रेमात पडल्यावर त्यांना कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते हे मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धार्थ आणि जान्हवीचा हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.