For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘ऑपरेशन वॅलेंटाइन’चा ट्रेलर प्रदर्शित

06:04 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ऑपरेशन वॅलेंटाइन’चा ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

Advertisement

अलिकडेच एरियल अॅक्शनवर ऋतिक रोशनचा चित्रपट ‘फायटर’ प्रदर्शित झाला होता. आता एरियल अॅक्शन दाखविणारा आणखी एक चित्रपट येत असून याचे नाव ‘ऑपरेशन वॅलेंटाइन’ आहे. या चित्रपटात वरुण तेज आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. सलमान खान आणि राम चरणने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ऑपरेशन वॅलेंटाइन’ चित्रपटाचे दिग्दर्शन शक्तिप्रताप सिंह हाडा यांनी केले आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.  त्यानंतर भारतीय वायुदलाने प्रत्युतरादाखल कारवाई करत पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला होता. या घटनेवरच हा चित्रपट आधारित असून यात वरुण तेजने वायुदल वैमानिकाची भूमिका साकारली आहे. मानुषी देखील वायुदल सैनिकाच्या भूमिकेत आहे.

Advertisement

ऑपरेशन वॅलेंटाइन हा चित्रपट 1 मार्च रोजी हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटातील वरुण तेजची भूमिका ही कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांच्यावर प्रेरित असल्याचे समजते. अभिनंदन यांनी पुलवामा हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी एफ-16 विमानाला पाडविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.