For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘नई नवेली’चा ट्रेलर प्रदर्शित

06:41 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नई नवेली’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

यामी गौतम मुख्य भूमिकेत

Advertisement

निर्मात्यांनी अभिनेत्री यामी गौतमचा आगामी चित्रपट ‘नई नवेली’चा ट्रेलर जारी केला आहे. या चित्रपटात यामी गौतम ही अत्यंत वेगळ्या शैलीत दिसून येणार आहे. याच्या ट्रेलरची सुरुवात एका विवाहाने होते. आपल्या घरात एक असाधारण सून असल्याचे परिवाराला वाटते. परंतु पुढे जात हळूहळू नवनवी रहस्यं समोर येऊ लागतात.

सून चेटकिण असल्याचे परिवारातील एका सदस्याला वाटते, परंतु प्रारंभी कोणाला ते खरे वाटत नाही. हळूहळू सुनेचे खरे रुप पहायला मिळते. परंतु ट्रेलरमधून चित्रपटाची कहाणी पूर्णपणे समजत नाही. पण ट्रेलरच्या अखेरीस रावणाचा उल्लेख होतो आणि अॅक्शनदृश्यंही दिसून येतात.

Advertisement

‘नई नवेली’मध्ये यामी ही मोहिनी नावाची भूमिका साकारत आहे. तर चित्रपटाच्या कहाणीत मेरठची पार्श्वभूमी आहे. ट्रेलरची सुरुवात एक सामान्य भारतीय परिवार आणि त्याच्या नव्या सुनेने होते. विवाहाचे विधी, परिवाराच्या सदस्यांमधील भांडण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा कहाणीला मजेशीर स्वरुप देतात.

चित्रपटात ‘भाभी डायन है’युक्त रहस्य देखील कहाणीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. कहाणीत कॉमेडी, रहस्य, फँटेसी आणि अॅक्शनचा जबरदस्त मिलाप दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केले आहे. तर याची कहाणी हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. आनंद. एल. राय आणि हिमांशु शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाला जी.व्ही. प्रकाश कुमारने संगीत दिले आहे.  ‘नई नवेली’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.