‘माय मेलबर्न’चा ट्रेलर सादर
क्रिएटिव्ह दिग्दर्शकांकडून उत्तम कहाण्यांचे सादरीकरण
मेलबर्न शहराच्या बॅकड्रॉपवर चार उत्तम कहाण्यांना सामावत एक चित्रपट ‘माय मेलबर्न’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या कहाण्यांमध्ये मानवी कनेक्ट, ओळखीशी निगडित प्रश्न यासारखे अनेक विषय मांडण्यात आले आहेत. या चित्रपटाशी कबीर खान, इम्तियाज अली, रीमा दास आणि ओनिर यासारखे प्रभावी दिग्दर्शक जोडलेले आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाने एक-एक कहाणीला स्वत:च्या पद्धतीने दर्शविले आहे. यात एकूण चार कहाण्या असून नंदिनी, जूल्स, एम्मा आणि सेतारा अशी त्यांची शीर्षकं आहेत.
नंदिनी नावाची कहाणी ओनिरने दिग्दर्शित केली. ही कहाणी इंद्रनील नावाच्या युवकाची असून तो समलैंगिक आहे. तो मेलबर्नमध्ये राहतो, अचानक नीलला भेटण्यासाठी त्याचे वडिल येतात. या कहाणीत पिता आणि मुलाच्या तणावयुक्त नात्याला दर्शविण्यात आले आहे. तर जूल्सला आरिफ अलीकडून दिग्दर्शित करण्यात आले आहे. तर इम्तियाज अली या क्रिएटिव्ह डायरेक्टरने या कहाणीसाठी काम केले आहे. ही एका नवविवाहित युवतीची कहाणी आहे. जी एक बेघर महिला जूल्ससोबत नात्यात जोडली जाते. एम्मा या कहाणीला रीमा दास यांनी दिग्दर्शित केले आहे ही कहाणी एका डान्सरची असून ती बहिरी असते. ती स्वत:ची शक्ती कशी ओळखते, कशी पुढे जाते हे या कहाणीत दाखविण्यात आले आहे. तर कबीर खानने सेतारा नावाच्या कहाणीला दिग्दर्शित केले आहे. ही कहाणी एका 15 वर्षीय अफगाणी मुलीवर आधारित आहे. या मुलीला क्रिकेट खेळायचे असते. तालिबानपासून वाचत मेलबर्न येथे पोहोचल्यावर ती स्वत:चे नाव जीवन सुरू करते.
माय मेलबर्न हा चित्रपट 14 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अर्का दास, मौली गांगुली, रॉयन लॉसन, सेतारा अमीरी, अरुषि शर्मा आणि कॅट स्टीवर्ट यासारखे कलाकार दिसून येतील.