‘मोर्टल कॉम्बॅट 2’चा ट्रेलर सादर
वार्नर ब्रदर्सनी ‘मॉर्टल कॉम्बॅट 2’चा ट्रेलर जारी केला असून तो प्रसिद्ध व्हिडिओ गेम सीरिजवर आधारित आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये लॉर्ड रॅडेन जॉनी केजला मॉर्टल कॉम्बॅट टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी बोलविले जात असल्याचे दिसून येते, यात किटाना, शाओ खान, लियू कांग, जॅक्स आणि बाराका यासारख्या व्यक्तिरेखा दिसून येतात. हा चित्रपट पहिल्या भागाच्या तुलनेत अधिक रोमांचक आहे, चित्रपटाला आर रेटिंग मिळाले असून ट्रेलरमध्ये स्कॉर्पियनला नूब सायबोट याला हरविताना दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात कार्ल अर्बन (जॉनी केज), मार्टिन फोर्ड, एडलिन रुडोल्फ, जेसिका मॅकनेमी, लुईस टॅन, जो तस्लीम (सब-झिरो) आणि हिरोयुकी सनाडा (स्कॉर्पियन) यासारखे कलाकार आहेत. अनेक चाहते लियू कांगला मुख्य व्यक्तिरेखेच्या स्वरुपात पाहू इच्छित होते, परंतु यावेळी जॉनी केज कहाणीच्या मध्यवर्ती स्थानी असणार आहे.