‘मित्रोपोलिटन’चा ट्रेलर सादर
टीव्हीएफ प्रेक्षकांसाठी रंजक आणि अनोख्या कहाण्या सादर करत असते. भारतीय युवावर्गाच्या भावना अन् मानसिकतेची जाण असल्याचे टीव्हीएफने वारंवार सिद्ध केले आहे. अनेक प्रेरणादायी कहाण्या सादर केल्यावर टीव्हीएफ आता नवी कहाणी ‘मित्रोपोलिटन’सोबत परत भेटीला येत आहे. हा शो महानगरात येऊन नवी सुरुवात करणाऱ्या इसमाची कहाणी दर्शविणारा आहे. मित्रोपोलिटन शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा शो कॉलेजनंतर महानगरात येऊन स्थायिक होण्याची कहाणी दर्शवितो. फिगर-इट-आउट-एज-यू-गो रोमांचप्रमाणे ही कहाणी आहे. कॉमेडी, नाट्यामयता आणि उत्कृष्ट अभिनयाने भरपूर हा शो युवांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या आयुष्यातील मजेशीर क्षण दर्शवितो. या शोमध्ये बद्री चौहान, जसमीत सिंह भाटिया, केविन जिंगखाई, विश्वजीत प्रताप सिंह, साधिका स्याल, शिवांगी नेगी आणि प्रवीण राज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टीव्हीएफने यापूर्वी कोटा फॅक्ट्री, पंचायत, गुल्लक, सपने बनाम सब या सीरिज निर्माण केल्या आहेत. आता मित्रोपोलिटन देखील टीव्हीएफच्या उत्तम कंटेंटच्या यादीत सामील होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.