महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मैं अटल हूं’चा ट्रेलर प्रदर्शित

06:40 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिग्दर्शक रवि जाधव यांच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘मैं अटल हूं’वरून दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी हे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहेत. निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर पाहुन तुमची चित्रपटासाठीची उत्सुकता वाढणार आहे.

Advertisement

3 मिनिटे 37 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये भाजपचे दिग्गज नेते राहिलेले अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन आणि राजकीय संघर्षांचा तपशील उत्तमप्रकारे दर्शविण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी हे कशाप्रकारे देशातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले याची झलक याच्या ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

वाजपेयींची व्यक्तिरेखा त्रिपाठी यांनी प्रभावीपणे साकारली आहे. त्यांची संवादफेक आणि हावभाव पाहून निश्चितपणे काही क्षणांसाठी वाजपेयींची आठवण होते. ‘दलों के दलदल में कमल खिलाना है’ असा संवाद चित्रपटात असून तो प्रेक्षकांची मने जिंकणारा आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 19 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article