‘केसरी चॅप्टर 2’चा ट्रेलर सादर
अक्षय कुमार, माधवन, अनन्या मुख्य भूमिकेत
अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘केसरी 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनाला हेलकावून टाकणार आहे. अक्षय यावेळी मोठ्या पडद्यावर अमृतसर येथे झालेल्या जालियांवाला बाग नरसंहाराची कहाणी घेऊन येत आहे.
केसरी चॅप्टर 2 मध्ये अक्षय कुमारने सी. शंकरन नायर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. नायर यांनी 1919 मध्ये झालेल्या जालियांवाला बाग नरसंहारानंतर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कायदेशीर लढा दिला होता. जालियांवाला बाग नरसंहारात हजारो निष्पाप भारतीयांना जीव गमवावा लागला होता.
केसरी चॅप्टर 2 : द अनसोल्ड स्टोरी ऑफ जालियांवाला बाग’ चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन करण सिंह त्यागीने केले आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद मांडणाऱ्या वकिलाची भूमिका आर. माधवनने साकारली आहे. तर अनन्या पांडे देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
अक्षय कुमारने ‘केसरी’ चित्रपटात ईशर सिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती. यात सारागढीच्या युद्धाला दर्शविण्यात आले होते. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता केसरी 2 मध्ये यापेक्षा वेगळी एक कहाणी पहायला मिळणार आहे.