For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कर्मा कॉलिंग’चा ट्रेलर सादर

06:38 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कर्मा कॉलिंग’चा ट्रेलर सादर
Advertisement

रविना टंडनची वेबसीरिज लवकरच येणार

Advertisement

अभिनेत्री रविना टंडन आता ओटीटीच्या जगतात स्वत:चे स्थान निर्माण करू पाहत आहे. तिची नवी वेबसीरिज ‘कर्मा कॉलिंग’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये रविना ही  इंद्राणी कोठारी ही भूमिका साकारत आहे. 90 च्या दशकातील बॉलिवूड क्वीन आणि आता अलीबाग येथील मोठे प्रस्थ असलेल्या महिलेची ही भूमिका आहे. कर्मा कॉलिंग ही सीरिज अमेरिकन सीरिज ‘रिव्हेंज’वर आधारित आहे. ग्लॅमर जगतामागील छळ आणि फसवणुकीची वास्तव यात दाखविले जाणार आहे.

‘जब आपका सबकुछ राख हो चुका हो, एक ही रास्ता बचता है, बदला’ असा संवाद ट्रेलरच्या प्रारंभी आहे. यानंतर इंद्राणी कोठारी या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली जाते. इंद्राणी 90 च्या दशकातील अभिनेत्री असल्याचे सांगण्यात येते. तिचा सामना ‘कर्मा’शी झाल्यावर जीवनात येणारे वादळ या कहाणीद्वारे दर्शविले जाणार आहे.

Advertisement

कर्मा कॉलिंगमध्ये रविना टंडनसोबत वरुण सूद, नम्रता सेठ, विक्रमजीत विर्क, विराफ पटेल, रोहित रॉय, एमी एला यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन रुचि नारायण यांनी केले आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर पाहता येणार आहे.  26 जानेवारी रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

रविना टंडनने 33 वर्षांपूर्वी 1991 मध्ये ‘पत्थर के फुल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.  90 च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चा प्रभाव कायम ठेवला आहे. चित्रपटांसोबत आता ती ओटीटीवर झळकत आहे. रविनाने 2021 मध्ये ‘आरण्यक’ या सीरिजमध्ये काम केले होते. आता कर्मा कॉलिंग ही तिची दुसरी वेबसीरिज आहे.

Advertisement
Tags :

.