‘जटाधरा’चा ट्रेलर प्रदर्शित
महेश बाबूने वेंकट कल्याण यांचा आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट ‘जटाधरा’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सुधीर बाबू, शिल्पा शिरोडकर आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात दिव्या खोसलाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ट्रेलर प्रेक्षकांना भारतीय लोककथा आणि अलौकिक घटकांवर आधारित कहाणीची झलक दाखवून देतो. काळी जादू केवळ एका विधीपेक्षा खूप मोठी असल्याचे दाखविणारी ही कहाणी आहे. ‘जटाधरा’ अलौकिक शक्तींना अस्त्र म्हणून वापरण्याचा शोध घेतो, ज्या अनियंत्रित शक्तींना मुक्त करू शकते. कहाणी एका पिशाच्चाभवती घुटमळणारी असून याची भूमिका सोनाक्षीने साकारली असून ते शतकांपासून एका सोन्याच्या खजिन्याचे रक्षण करत असते. याची कहाणी खजिन्याच्या शोधापासून सुरू होत धोके, शाप आणि सूड घेऊ पाहणाऱ्या आत्म्यांनी भरलेल्या प्रवासात बदलून जाते. सुधीर बाबू यात एक घोस्ट हंटरच्या भूमिकेत आहे. तर शिल्पा शिरोडकर एका लालची महिलेच्या भूमिकेत आहे.