For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गव्हर्नरचा ट्रेलर सादर

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गव्हर्नरचा ट्रेलर सादर
Advertisement

12 जून रोजी होणार प्रदर्शित

Advertisement

अभिनेता मनोज वाजपेयीचा आगामी चित्रपट गव्हर्नरचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकातील देशासमोर उभ्या ठाकलेल्या गंभीर आर्थिक संकटावर बेतलेला आहे. त्यावेळी देश दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. याच्या ट्रेलरमध्ये भीती, तणाव आणि देशाला वाचविण्याच्या प्रयत्नांना अत्यंत गंभीर शैलीत दर्शविण्यात आले आहे. देशाच्या कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन जनतेत चीड अन् अस्वस्थता असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. लोक सरकार आणि आर्थिक स्थितीवरून चिंतेत आहेत, देशाला आर्थिक स्वरुपात कोलमडण्यापासून कशाप्रकारे रोखले जावे हा सर्वात मोठा प्रश्न होता. हा चित्रपट सत्यघटनांनी प्रेरित असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी आरबीआय गव्हर्नरांच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. त्याची व्यक्तिरेखा देशाच्या बिघडत्या आर्थिक स्थितीला सावरणे आणि भारताला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दाखविण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये अदा शर्मा देखील दिसून येते. मनोज यात एस. वेंकटरमन यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे. तर निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. याची कहाणी सुवेंदु भट्टाचार्य, सौरभ भारत, रवि असरानी आणि विपुल शाह यांनी मिळून लिहिली आहे. या चित्रपटासाठी गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले आहे, तर अमित त्रिवेदीने या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.