‘धडक 2’चा ट्रेलर सादर
6 वर्षांनी धडक या चित्रपटाचा सीक्वेल ‘धडक 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या चित्रपटात दोन प्रेम करणाऱ्यांदरम्यान सामाजिक स्थितीची भिंत दाखविण्यात आली होती, परंतु यावेळी जातीवर आधारित कहाणी असणार आहे. करण जौहरकडून निर्मित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ति डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधील दोघांच्या जोडीला मोठी पसंती मिळत आहे. निलेश आणि विधि हे परस्परांच्या प्रेमात पाडतात, परंतु विधिच्या कुटुंबीयांना निलेशविषयी कळते, निलेशला अपमानित केले जाते, त्याला मारहाण केली जाते. सामाजिक आव्हानांवर मात करत निलेश आणि विधि एकत्र येऊ शकणार का नाही यावरच याची कहाणी बेतलेली आहे. चित्रपटात तृप्ति, सिद्धांतसोबत सौरभ सचदेव, मंजिरी पुपाला, विपिन शर्मा, दिशांक अरोडा हे कलाकार आहेत.