महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘देवरा पार्ट 2’चा ट्रेलर सादर

06:22 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ सध्या देशभरात आहे. अनेक महिन्यांपासून तेलगू चित्रपट ‘देवरा पार्ट 1’ च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा केली जात होती. कोरताला शिवा यांच्या दिग्दर्शनात तयार देवरा या चित्रपटात सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत..

Advertisement

या चित्रपटाद्वारे जान्हवीने तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. देवराच्या गाण्यांमध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलर अॅक्शनने भरपूर असून यात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. यात त्याची व्यक्तिरेखा एका जहाजावर लोकांना निर्दयीपणे मारहाण करताना दिसून येते. यानंतर ट्रेलरमध्ये ज्युनियर एनटीआरची एंट्री दाखविण्यात आली आहे.

Advertisement

ट्रेलरमध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीचा रोमान्सही दाखविण्यात आला आहे. चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीकरता शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटात सहाय्यक भूमिकेत प्रकाश राज देखील दिसून येणार आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article