‘देवघर ऑन रेंट’चा ट्रेलर जारी
कर्म वसुलीला निघालं की, कोणाचाही वशिला चालत नाही
अध्यात्म, रहस्य, थरार आणि अॅक्शन यांची अनोखी सांगड घालणारा ‘देवघर ऑन रेंट’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रहस्य आणि थरारासोबत भावनिक पदरही पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात असून त्यातून कथानकाची थरारक झलक दिसून येते. हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी झळकणार आहे.
या चित्रपटची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा स्वरुप सावंत यांनी सांभाळली आहे. तर कथा-पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.
पोलीस तपास, संशयास्पद घटना, संघर्ष आणि व्यक्तिरेखांमधील तणाव यामुळे कथानक अधिकाधिक उत्कंठावर्धक होत जाते. पोलीस अधिकारी, गुन्हेगारी जगत आणि एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांची गुंफण ट्रेलरमध्ये दिसते. नाट्यामय घडामोडींनी भरलेल्या कथानकाला अॅक्शनची प्रभावी जोड देण्यात आली असून दाक्षिणात्य शैलीच्या अॅक्शनमुळे चित्रपटाचा आवाका अधिक भव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका असून केजीएफ फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.