For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘दायरा’चा ट्रेलर जारी

06:49 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘दायरा’चा ट्रेलर जारी
Advertisement

दायरा’ या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात करिना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन दोघेही पोलिसांच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. अल्पवयीनांशी निगडित गुन्ह्याच्या एका प्रकरणात दोघेही आमने-सामने येत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. मेघना गुलजारकडून दिग्दर्शित हा चित्रपट कायदा, न्याय आणि उत्तरदायित्वादरम्यान संघर्ष दाखवितो, कारण यात एका वादग्रस्त पोलीस चकमकीचा तपास दर्शविण्यात आला आहे.

Advertisement

करिनाने यात डीसीपी अजूनी कोहली ही भूमिका साकारली आहे. तर पृथ्वीराज यात डीसीपी रमण कुमारच्या भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात एका पोलीस चकमकीशी निगडित प्रकरणावर दोन्ही अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेने होते. याचा तपास पुढे सरकू लागताच कर्तव्य आणि न्यायावरून त्यांच्या दृष्टीकोनात संघर्ष होऊ लागतो.

एक परिवार स्वत:च्या बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. चौकशीनंतर मागील दोन वर्षांपासून संबंधित मार्गावर सक्रीय असलेल्या एका आरोपीविषयी माहिती समोर येते. बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोपी अल्पवयीन असल्यास अल्पवयीनांच्या सुरक्षेशी निगडित कायदे लागू व्हावेत का असा प्रश्न यात उपस्थित होतो. दोन्ही अधिकारी परस्परांची प्रक्रिया, उत्तरदायित्व, आणि स्वत:च्या जबाबदारीच्या मर्यादा समजाविण्याच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित करतात.

Advertisement

दायरा हा चित्रपट सत्या घटनांवर आधारित आहे. एका मोठ्या गुन्ह्यामुळे जनतेत आक्रोश कशाप्रकारे निर्माण होतो अणि अनेक चौकशी प्रक्रिया सुरू होतात हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी, क्षिती जोग, कंवलजीत सिंह, संदीप कुलकर्णी आणि तृप्ती खामकर देखील सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.