‘क्रिमिनल जस्टिस 4’चा ट्रेलर सादर
ओटीटीवर पुन्हा येणार वकील माधव मिश्रा
क्रिमिनल जस्टिस : ए फॅमिली मॅटर’सह वकील माधव मिश्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या बहुप्रतीक्षिक सीरिजच्या चौथ्या सीझनचे दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी केले असून निर्मिती बीबीसी स्टुडिओज इंडियाने केली आहे. नवा सीझन 29 मे पासून जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
क्रिमिनल जस्टि 4 चा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. ‘यावेळी सत्याचे दोन नव्हे तर तीन पैलू आहेत, मिश्रा यांच्या कारकीर्दीतील सर्वात गुंतागुंतीच्या खटल्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा’ अशी कॅप्शन ट्रेलरच्या व्हिडिओला देण्यात आली आहे. चौथ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठीसोबत मोहम्मद जीशान अय्यूब, सुरवीन चावला, आशा नेगी, खुशबू अत्रे, बरखा सिंह, आत्मप्रकाश मिश्रा, मीता वशिष्ठ आणि श्वेता बसु प्रसाद यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.
या सीझनची कहाणी एका प्रभावशाली परिवाराच्या अवतभवती घुटमळणारी आहे. हा परिवार एका खळबळजनक हत्येमुळे प्रकाशझोतात आलेला आहे. या हत्येच्या खटल्यादरम्यान तीन वेगवेगळ्या दाव्यांमुळे गुंतागुंत निर्माण होते. प्रत्येक पक्षकाराला स्वत:कडे सत्य असल्याचे वाटत असते. नेहमीप्रमाणे माधव मिश्रा या गुंतागुंतीच्या स्थितीत स्वत:च्या खास शैलीसह सत्याचा शोध घेणार आहे.