‘क्राइम बीट’चा ट्रेलर सादर
क्राइम बीट नावाची सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या मूळापर्यंत जाणे पत्रकारासाठी किती आव्हानात्मक असते हे यात दाखविण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये साकिब सलीम क्राइम जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. संजीव कौल आणि सुधीर मिश्रा यांनी मिळून याची कहाणी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे.
साकिबसोबत या सीरिजमध्ये सबा आझाद, राहुल भट्ट, सई ताम्हणकर, दानिश हुसैन आणि राजेश तैलंग यासारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत. साकिबने यात अभिषेक सिन्हा ही व्यक्तिरेखा साकारली असून तो एका मोठ्या प्रसारमाध्यमात पत्रकार असतो. पोलिसांच्या शोषणात्मक कारवाईच्या विरोधात आवाज उठविणारा हा पत्रकार आहे.
एका खळबळजनक प्रकरणाचा थांगपत्ता त्याला लागतो, परंतु त्यातील सत्याचा शोध घेणे त्याच्यासाठी धोकादायक ठरते. गुन्हेगारांच्या कोंडाळ्यात सापडलेल्या हा पत्रकार सत्य समोर आणण्यास यशस्वी ठरतो का हे सीरिज पाहिल्यावरच कळणार आहे.
झी5 ची ही सीरिज 21 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘स्टार्स वॉर्स द बॅच बॅच’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. क्राइम बीटमध्ये ऋतिक रोशनची प्रेयसी सबा आझाद मुख्य भूमिकेत असल्याने याची जोरदार चर्चा होत आहे. तर ट्रेलर पाहून सबा आझादपेक्षा साकिब सलीमचे प्रेक्षक अधिक कौतुक करत आहेत.