‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित
वरुण धवन, कीर्ति सुरेश मुख्य भूमिकेत
एटलीचा चित्रपट ‘बेबी जॉन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यातील नैन मटक्का या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. तर निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये वरुण धवनची झलक दिसून येत असून यात कीर्ति सुरेश अणि वामिका गब्बी देखील मुख्य भूमिकेत आहे. तर सलमान खान हा कॅमियो भूमिकेत दिसून येणार आहे.
जॅकी श्रॉफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असून तो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. एटली, कॅलीज आणि सुमित अरोडा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वामिका गब्बी देखील या चित्रपटात असल्याने तिचा दमदार अभिनय यात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.