महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ए क्वाइट प्लेस डे वन’चा ट्रेलर सादर

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिग्दर्शक आणि अभिनेता जॉन क्रासिंस्कीच्या ‘ए क्वाइट प्लेस’ने 2048 मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली होती. एमिली ब्लंट आणि जॉनची मुख्य भूमिका असलेल्या विज्ञान-फाई हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळविले होते. 2020 मध्ये या चित्रपटाचा सीक्वेल आला होता, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न निर्माण केले होते. आता याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निर्माते चित्रपटाचा प्रीक्वेल ‘ए क्वाइट प्लेस : डे वन’ घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात घातक आक्रमणाची सुरुवात कशी झाली, हे दाखविण्यात आले आहे. एबट परिवार विदेशी आक्रमणाला सामोरे जात असल्याचे ट्रेलरच्या प्रारंभी दिसून येते. 400 दिवसांपेक्षा अधिक काळापासून प्राण्यांनी उपनगरीय शहरावर कब्जा केला असून परिवार परस्परांमध्ये संभाषण करण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. चित्रपटाची मुख्य नायिका ल्युपिटा न्योंगो न्यूयॉर्कमध्ये असताना अचानक आकाशातून आगीचे गोळे पडल्याने सर्वकाही नष्ट झाल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते तसेच धूराच्या लोटांमध्ये विचित्र प्राणी लोकांवर हल्ला करताना यात दाखविण्यात आले आहे. मायकल सरनोस्कीकडून दिग्दर्शित या चित्रपटात ल्युपिटा न्योंगो, एलेक्स वोल्फ आणि जोसेफ क्विन मुख्य भूमिक आहे. ए क्वाइट प्लेस : डे वन हा चित्रपट 28 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती पॅरामाउंट पिक्चर्स, संडे नाइट प्रॉडक्शन्स आणि प्लॅटिनम ड्यून्सकडून करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article