महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘28 ईयर्स लेटर’चा ट्रेलर सादर

06:42 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किलियन मर्फीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन

Advertisement

हॉलिवूड अभिनेता किलियन मर्फी हा जगभरात नावाजलेला अभिनेता आहे. तो चित्रपटाची व्यक्तिरेखा स्वत:ला त्यात पूर्णपणे ओतून साकारत असतो. ओपेनहायमर यासारख्या चित्रपटात दमदार अभिनय केल्यावर आता तो ‘28 ईयर्स लेटर’ चित्रपटात दिसून येणार आहे.  याचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात त्याची किंचित झलक दाखविण्यात आली आहे.

Advertisement

यातील त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. यात तो सांगाड्याप्रमाणे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर विजेते डॅनी बॉयल यांनी केले आहे. 28 ईयर्स लेटर या चित्रपटात जॉडी कॉमर, एरन टेलर-जॉन्सन आणि राल्फ फिएनेस देखील दिसून येणार आहे. 2002 साली प्रदर्शित 28 डेज लेटर या फ्रेंचाइजीचा हा पुढील चित्रपट आहे. यात किलियनने जिम नावाच्या इसमाची भूमिका साकारली होती, जो आता सीक्वेलमध्ये जॉम्बी होतो.

आयरिश अभिनेता किलियन मर्फी 1990 पासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. 2002 साली त्याचा 28 डेज लेटर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मग 2007 मध्ये याचा सीक्वेल आला, ज्याचे नाव 28 वीक्स लेटर होते. आता 28 ईयर्स लेटर चित्रपट येत असून तो 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article