‘प्रीडेटर : बॅडलँड्स’चा ट्रेलर सादर
ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओने ‘प्रीडेटर : बॅडलँड्स’चा पहिला ट्रेलर आणि पोस्टर जारी केला आहे. हा लोकप्रिय अॅक्शन सायन्स-फिक्शन फ्रँचाइजीचा सहावा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॅन ट्रेचेनबर्ग ‘प्री’ने केले आहे. प्रीडेटर : बॅडलँड्स हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रीडेटर : बॅडलँड्स चित्रपटात एले पॅनिंग आणि दिमित्रियस शूस्टर-कोलोमाटांगी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची निर्मिती जॉन डेव्हिस, डॅन ट्रेचेनबर्ग, मार्क टोबेरॉफ, बेन रोसेनब्लॅट, ब्रेंट ओ कॉनर यांनी केली आहे. अभिनेता एका ग्रहावर अनेक शिकारी आणि प्राण्यांशी लढाई करतो आणि त्यांच्यावर विजय मिळवितो असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या ट्रेलरला आतापर्यंत 46 लाखाहून अधिक ह्यूज प्राप्त झाले आहेत. दिग्दर्शक डॅन ट्रेचेनबर्ग यांनी यापूर्वी ‘प्री’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा ‘प्रीडेटर’ चित्रपट सीरिजमधील अखेरचा भाग होता. प्री हा चित्रपट हुलूवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला 2024 च्या एमी अवॉर्ड्समध्ये चार नामांकनं मिळाली होती. तर उत्कृष्ट ध्वनी अन् एडिटिंगसाठी पुरस्कार मिळाला होता.