For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिस्टोफर नोलनच्या ‘द ओडिसी’चा ट्रेलर सादर

06:56 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
क्रिस्टोफर नोलनच्या ‘द ओडिसी’चा ट्रेलर सादर
Advertisement

मॅट डॅमन, एनी हॅथवे मुख्य भूमिकेत

Advertisement

‘द ओपेनहायमर’ चित्रपटानंतर क्रिस्टोफर नोलन आणखी एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘द ओडिसी’ असून यासंबंधी मोठी उत्सुकता दिसून येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात अभिनेता मॅट डॅमनला इथाकाचा राजा ओडिसियसच्या रुपात दाखविण्यात आले आहे, जो ट्रोजन युद्धानंतर स्वत:च्या सैनिकांना घरी नेत आहे.

ट्रेलमध्ये सागरी दृश्य अधिक  पहायला मिळतात, जी अत्यंत सुंदरपणे चित्रित करण्यात आली आहेत. युद्धानंतर परतणारे सैनिक असो किंवा युद्धादरम्यानची स्थिती, नौकेवर स्वार सैनिकांच्या तुकड्यांचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. एक सैनिक युद्धावर जाताना कोणत्या भावनात्मक स्थितींना सामोरा जातो याची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

या चित्रपटात मॅड डॅमनने ओडिसियसची भूमिका साकारली आहे. तर टॉम हॉलंडला ओडिसियसचा पुत्र टेलीमाचसच्या रुपात दाखविण्यात आले आहे.  ऐनी हॅथवे ही ओडिसियसची पत्नी पेनेलोपच्या भूमिकेत आहे. चित्रपटात रॉबर्ट पॅटिन्सन, जेंडाया, लुपिया न्येंगो, चार्लीज थेरॉन, मिया गोथ, बेनी सफ्डी यासारखे कलाकारही आहेत.

नोलनचा हा चित्रपट नवे आयमॅक्स तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रित करण्यात आला आहे. हा चित्रपट 17 जुलै रोजी प्रदर्शित झाला असून याची तिकीटे यापूर्वीच विकली गेली आहेत.

Advertisement
Tags :

.