For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेन एफ्लेकच्या ‘अॅनिमल्स’चा ट्रेलर प्रदर्शित

06:43 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेन एफ्लेकच्या ‘अॅनिमल्स’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

नेटफ्लिक्सवर धमाल करणार थ्रिलर चित्रपट

Advertisement

गुड विल हंटिंग, द टाउन आणि गॉन गर्ल यासारख्या यशस्वी चित्रपटांनंतर अमेरिकन अभिनेता बेन एफ्लेक स्वत:चा आगामी थ्रिलरपट अॅनिमल्ससोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतत आहे. अॅनिमल्स या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. तसेच नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे.

या चित्रपटात बेनचे पात्र मार्क किम्बलचे सादरीकरण करण्यात आले असून तो एक यशस्वी इसम असून मोठ्या सुंदरपणे अन् काळजीपूर्वक स्वत:च्या परिवाराला सांभाळत असतो. परंतु त्याचा मुलगा डेनी याचे अपहरण झाल्यावर त्याच्या आयुष्यात उलथापालथ सुरू होते.

Advertisement

मार्कची पत्नी एबिगेल पतीसोबत मिळून स्वत:च्या मुलाच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. बेन एफ्लेकचा हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘जेव्हा कुठलीही खासगी गोष्ट पणाला लागली असेल तर कुठलेच नियम नसतात, अॅनिमल्स पहा पुढील महिन्यात केवळ नेटफ्लिक्सवर’ या कॅप्शनसह नवे पोस्टर जारी करण्यात आले आहे.

बेन एफ्लेकनेच या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे तसेच त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन पेले आहे. बेन एफ्लेकसोबत चित्रपटात कॅरी वॉशिंग्टन मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर गिलियन एंडरसन, स्टीव येउन, लुईस गेरार्डो मेंड्ज, एड्रियाना पाज, रे फिशर, मॅट गेराल्ड, मार्क कस्सेन, क्रिस्टोफर वुडली हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.