Kagal News | कागलमध्ये दुर्दैवी घटना; राहत्या घराची भिंत अंगावर कोसळून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू
01:34 PM Jul 09, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कागल -कागल शहरातील लोहार गल्ली परिसरात बुधवारी रात्री राहत्या घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
Advertisement
ही घटना बुधवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील भिंत अचानक कोसळून उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले . मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे कागल शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Advertisement
Advertisement