सालपे येथे माय-लेकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
लोणंद :
सालपे (ता. फलटण) गावच्या हद्दीत सोमवारी एक काळजाला चिरणारी घटना घडली. माधुरी लक्ष्मण कचरे (वय 28) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा शंभुराज लक्ष्मण कचरे हे दोघेही पंधरकी नावाच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, ही दुर्घटना सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. सालपे गावच्या हद्दीत कोळेकर वस्तीशेजारी असलेल्या पंधरकी नावच्या शिवारातील विहिरीकडे माधुरी लक्ष्मण कचरे (वय 28 वर्षे), व शंभुराज लक्ष्मण कचरे (वय- 7 वर्षे दोन्ही रा. सालपे, ता. फलटण) हे विहिरीत पडुन मयत झाले आहेत. तरी त्यांचे झाले मयताचा तपास व्हावा, अशी या घटनेची माहिती दादा यशवंत कचरे (वय 37) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक मदने हे करीत आहेत. या घटनेची माहिती गावात पसरताच संपूर्ण सालपे गावात शोककळा पसरली आहे.