आचरा - हिर्लेवाडी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक झाली होती ठप्प
सरपंच फर्नांडिस व सदस्य मुजावर यांच्या तत्परतेने वाहतूक पूर्ववत
आचरा प्रतिनिधी
आचरा हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर रविवारी पहाटे आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळीच येणाऱ्या एसटी बस आणि खाजगी गाड्या अडकल्या होत्या. आंब्याच्या फांदी सोबत विद्युत वाहिनीवरही पडल्याने होत्या. यामुळे विद्युत वाहिन्या खाली येऊन धोका निर्माण झाला होता. आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस व सदस्य चावलं मुजावर यांनी तत्परतेने कोसळलेले झाड हटवत वाहतूक पूर्ववत केली. रस्त्यावर झाड कोसळ्याची माहिती एसटी चालक यांनी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांना दिली. सदस्य मुजावर यांनी सरपंच जेरान फर्नांडिस यांच्यासमवेत ग्रामपंचायतचा कटर घेऊन हिर्लेवाडी येथे धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग वायंगणकर, अश्विन हळदणकर, किशोर हिर्लेकर, तोंडवळकर यांच्या सहाय्याने रस्त्यावरील पडलेले आंब्याचे झाड हटवून रस्ता मोकळा केला. विद्युत वाहिन्या खाली आल्याने धोकादायक बनल्या होत्या सरपंच फर्नांडीस यांनी वीज वितरण कार्यालयात सपंर्क करत याबाबतची माहिती दिली होती. सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्या तत्परतेबद्धल वाहनचालक, हिर्लेवाडी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.