For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कौंदलजवळ झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प

10:36 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
कौंदलजवळ झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प
Advertisement

खानापूर : खानापूर-नंदगड रस्त्यावर कौंदलजवळ मोठे झाड उन्मळून पडल्याने खानापूर- हल्याळ मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. वनकर्मचाऱ्यांनी झाड हटवून रस्ता मोकळा केला. खानापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास खानापूर-नंदगड रस्त्याकडेला असलेले मोठे झाड उन्मळून पडले. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. या रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र झाड पडले त्यावेळी रहदारी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Advertisement

याबाबतची माहिती वन कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर झाड बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. मुसळधार पावसामुळे रस्त्याकडेला असलेली झाडे पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी वनखात्याने जीर्ण झाडे तोडणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. यासाठी वनखात्याने रस्त्यावरील झाडांबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी वनखात्याने खबरदारी घेऊन रस्त्यावरील झाडे तोडावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.