कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईद ए मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वाहतूक मार्गात बदल

12:02 PM Sep 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहरात ईद ए मिलाद सणानिमित्त रविवार दि. 14 रोजी मुस्लीम बांधवांच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, ग्लोब सर्कल येथून जाऊन आसदखान दर्गा येथे सांगता होते. मिरवणूक काळात वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी रविवार दि. 14 रोजी सकाळी 8 ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गात बदल करण्यात आला आहे. किल्ला तलाव, अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कलकडून कॉलेज रोड मार्गे खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अशोक सर्कल, लेकव्ह्यू हॉस्पिटल, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटल, के.एल.ई., हिंडाल्को ब्रीज, बॉक्साईड रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंडलगा गणपती मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय नं. 2, शर्कत पार्क, एमएलआयआरसी कँटीन क्रॉस, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रस्त्याकडे जावे.

Advertisement

गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पूल रस्त्याच्या मार्गे शहराकडे येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कल, डावीकडून वळण घेऊन काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर येथून उजवीकडे वळण घेऊन एमएलआयआरसी कँटीन क्रॉस मार्गे पुढे जावे. खानापूरकडून काँग्रेस रोड मार्गावरून शहराकडे येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिरकडून डावीकडे वळण घेऊन एमएलआयआरसी कँटीन क्रॉस, शर्कत पार्क मार्गे पुढे जाऊन बॉक्साईड रोड येथून राष्ट्रीय महामार्गाकडे जावे. गोगटे सर्कलकडून येणाऱ्या वाहनांनी स्टेशन रोड मार्गे पुढे जाऊन भातकांडे स्कूल क्रॉस ओल्ड पी. बी. रोड मार्गे पुढे जावे. नाथ पै सर्कलकडून बँक ऑफ इंडियाकडे येणाऱ्या वाहनांनी बसवेश्वर सर्कल संभाजी गल्ली मार्गे पुढे जावे. जिजामाता सर्कलपासून देशपांडे पेट्रोलपंप, महात्मा फुले रोड गोवावेस सर्कलमार्गे पुढे जावे. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. त्याचबरोबर मिरवणूक निघणाऱ्या मार्गावर सर्वप्रकारची वाहने पार्क करण्यास निर्बंध असणार आहे.

Advertisement

पार्किंग स्थळ...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article