For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोकाट जनावरे हुसकावण्याची वेळ रहदारी पोलिसांवर

11:11 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोकाट जनावरे हुसकावण्याची वेळ रहदारी पोलिसांवर
Advertisement

बेळगाव : शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावरच ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांना आता हटविण्याची वेळ रहदारी पोलिसांवर आली आहे. मंगळवारी कित्तूर चन्नम्मा चौक येथे ठाण मांडून असलेल्या जनावरांना रहदारी पोलिसांनी हुसकावून लावले. गेल्या काही महिन्यांमध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढत चालली आहे. मुख्य बाजारपेठेसह शहरातील विविध रस्त्यांवर ही जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. महानगरपालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली तरी संख्या अधिक असल्याने त्या जनावरांना आवर घालणे कठीण झाले आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रस्त्यावरच ही जनावरे ठाण मांडून बसली होती. अखेर रहदारी पोलिसांनी त्यांना इतरत्र हुसकावून लावले. एक तर वाहतुकीला शिस्त लावायची यातच अशा प्रकारे पोलिसांवर जबाबदारी पडत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.