कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक अद्यापही बंदच...अद्याप रस्त्यावर दीड फूट पाणी
प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अद्याप दीड ते दोन फूट पुराचे पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आज मंगळवार दिनांक 30 जुलै रोजीही बंद आहे. चिखली आंबेवाडी दरम्यान दीड फूट पाणी असल्यामुळे गावाला अद्यापही बेटाचे स्वरूप ही प्राप्त आहे.
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रेडेडो ते केर्ली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आहे. या रस्त्यावर वडणगे फाटा (जौंदाळ मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर) येथे अध्याप दीड फूट पाणी आहे. तर केर्ली येथील जगबुडी पुलाजवळ अद्याप दोन फूट पाणी आहे. इतर ठिकाणी कमी-अधिक पुराचे पाणी पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अजूनही बंद आहे.
प्रयाग चिखली आंबेवाडी वरणगे या मुख्य रस्त्यावर अद्याप दीड फुट पाणी आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. चिखली गावाला अद्याप बेटाचे स्वरूप प्राप्त आहे. क्षेत्र प्रयाग येथे रस्त्यावर दीड फुट पाणी आहे.
वडणगे गावाला जोडणारा पवार पानंद या रस्त्यावर अद्याप दीड ते दोन फूट पाणी आहे त्यामुळे येथील वाहतूक ही बंद आहे. पाणी ओसरण्याची गती अत्यंत संथ असल्यामुळे या रस्त्यांवरील अधिकृत वाहतूक बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे.