महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोगटे कॉलेजतर्फे वाहतूक व्यवस्थापन उपक्रम

11:17 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीबीए विभागातर्फे अॅम्युमेनी-2024 या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सवांतर्गत वाहतूक व्यवस्थापन उपक्रम राबविला. वाहतूक पोलिसांच्या मदतीने प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ, समन्वयक राहुल कामुले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आरपीडी चौक, गोगटे सर्कल व कपिलेश्वर येथील वाहतूक व्यवस्थापन केले. सध्या शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. त्याबाबत जनजागृती करून वाहतूक व्यवस्थापन कसे केले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला. यावेळी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वाहतूक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करून या उपक्रमाचे कौतुक केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article