Satara : साताऱ्यात वाहतूक कोंडीचा मंत्र्यांना झटका
कोरेगावात ऊस वाहतुकीचा रस्त्यात अडथळा
एकंबे : उस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे कोरेगाव शहराचा श्वासच गुदमरला आहे. सलग दोन दिवस राज्याचे मंत्रीच वाहतूक कोंडीत अडकले. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना कोरेगावच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोरे यांचा ताफा बोराटवाडीतून साताऱ्याकडे रवाना झाला.
कोरेगाव शहरात येण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्वतः पुढाकार घेत पायलटिंग करत वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. सरस्वती विद्यालय ते रेल्वे स्टेशन मार्ग सुरळीत झाला, पण हिंद भवन चौक, साखळी पूल, भारतीय स्टेट बैंक, हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान आणि आझाद चौक परिसरात मंत्र्यांच्या ताफ्यालाच थांबावे लागले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलींच्या रांगा, शाळांच्या बसेस आणि बाईकवाल्यांची गर्दी झाली होती. कोरेगावमधून तब्बल १२ साखर कारखान्यांची ऊस वाहतूक चालते.
प्रत्येक कारखान्याचे ट्रॅक्टर, ट्रॉ ली आणि ट्रक शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवास करतात. वाहतूक नियोजनाचा अभाव, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि जबाबदार विभागांच्या निष्क्रियतेमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. दोन दिवस सलग मंत्र्यांनाच या कोंडीचा त्रास सहन करावा लागल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. पोलिसांनी प्रयत्न केले, पण ही जबाबदारी फक्त त्यांची नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, रस्ते विकास महामंडळ, परिवहन विभाग आणि साखर कारखाना व्यवस्थापन यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बची होत आहे. ट्रॉली वाहतुकीसाठी शहराबाहेरील बायपास मार्ग, ट्रॉ वाहतुकीचे ठराविक वेळापत्रक आणि ट्रक-ट्रॉलींवर जीपीएस बास नियंत्रण प्रणाली लागू करावी, अशी मागणी होत आहे. डील प्रशासनाने आता केवळ कागदी उपाययोजना न करता मुळे रस्त्यावर उतरून कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. यस अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.