kolhapur: औरवाड येथे वाहतुकीची कोंडी ; तिन्ही दिशेने समोरासमोर वाहने आल्यामुळे गोंधळ
वाहतूक नियंत्रक पोलिसाची गरज
नृसिंहवाडी : सलगर सदलगा राज्यमार्गावर नृसिंहवाडी जवळ औरवाड फाटा येथे तिन्ही रस्त्यावरून एकमेकांसमोर वाहने अचानक समोरासमोर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वादावादीचा प्रसंग घडला. वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याने शिरोळ, कुरुंदवाड, औरवाड मार्गावर वाहनाच्या लांब लांब रांगा लागल्याने सुमारे दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती.
दिवाळीची सुट्टी तसेच रविवारची सुट्टी यामुळे नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी लोक येत असतात. सलगर सदलगा, कागवाड पाच मेल या दोन राज्यमार्गासह शिरोळ कुरुंदवाड या तिन्ही रस्त्यावर रविवारी दुपारी अचानक एसटी बसेस,चार चाकी वाहने,दुचाकी वाहने अचानक समोरासमोर येऊन काही प्रमाणात धडका धडकी झाली. तिन्ही रस्त्यावर अचानक वाहने समोरासमोर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.
दिवाळी सुट्टी सार्वजनिक सुट्टी यामुळे या तिन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात व दोन राज्यमार्ग असल्यामुळे अवजड वाहनासह अन्य वाहनांची वर्दळ असते. यातील नृसिंहवाडी शिरोळ मार्गावरील औरवाड फाटा येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते मात्र येथे कोणीही वाहतूक नियंत्रण पोलीस असत नाही. यामुळे सातत्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन वादावादीचे प्रसंग घडत असतात.
आज रविवारच्या सुट्टीतही हाच अनुभव येथे येणाऱ्या वाहनधारकांना आला. हमारे दोन तास ही वाहतुकीची कोंडी अशीच होती. त्यामुळे नृसिंहवाडी शिरोळ, नृसिंहवाडी कुरुंदवाड, नृसिंहवाडी कागवाड या तिन्ही मार्गावर सुमारे एक किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांच्या वादावादीचा प्रसंग घडला. अखेर काही वेळानंतर सामाजिक कार्यकर्ते सागर मोरबाळे व त्यांच्या मित्र परिवाराने ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.
नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र तसेच येथे जोडणारे दोन राज्यमार्ग एक जिल्हा मार्ग यामुळे सातत्याने या तिन्ही मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते वारंवार वाहतुकीची कोंडी होते मात्र संबंधित पोलीस ठाण्याकडून येथे वाहतूक नियंत्रक पोलिसाची नेमणूक केली जात नाही यामुळे वादावादीचे प्रसंग होत आहेत. तरी या सलगर सदलगा राज्य मार्गावरील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियंत्रण पोलीस नेमण्याची गरज आहे. : सागर मोरबाळे, सामाजिक कार्यकर्ते, नृसिंहवाडी